Chapter – 1
“ तन्वी “
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
खरतर आज माझ्या आयु्ष्यातला खुप आनंदाचा दिवस . . . आज माझा शोणशी साखरपूडा ठरला, पण शोणचा चेहरा पाहून तो आनंदात नाही वाटला आणि माला insecurity वाटायला लागली.
शोण मला पुरेसा कधी कळलाच नसवा तो काधी-कधी एखद्या लहान मुलासारखा वागतो तर कधी-कधी ६० वर्षाच्या परीपक्व म्हातार्यासारखा…
साखरपुड्याला अजुन ३ अठवडे अवकाष आहे, पण हा वेळ तयारीला पूरणार आहे का? मी वेगळ्याच दुनीयेत, भविष्याची स्वप्न बघण्यात दंग होते…
मागची २ वर्ष मी लग्नासाठी शोणच्या मागे लागले होतेआणि आत्ता कुठे तो तयार झाला होता, लगेच दोघांचे आई –बाबा आणि मी घाईने साखरपुड्याची तारीख ठरवून टाकली. तारीख ठरल्याचा आनंद तर जाउचदे उलट तो तातडीने Mumbai ला गेला… का गेला हे मला माहीत होत आणि म्हणुनच . . .
साखरपुड्याची तारीख ठरून Mumbai ला निघतांना शोण मला म्हणाला . . .
शोण : मी इतक्या घाईने Mumbai ला का जातोय विचरणार नाहीस?
मी : नाही. . . कारण मला महीत आहे.. . तुझ्या आधी वैदेही माझ्याशी बोलली; तुझा number हवा होता तीला.. she looked upset… may be she need her best friend…तु जाउन ये शोण.. . नीघ आता नाहीतर flight miss करशील. . . . .
मी शोणला जवळ जवळ हकललाच.. . शोणला airport वर सोडुन घरी येताना मी कधी भुतकाळात हरवले मला कळलच नाही…
मी शोणला पहील्यांदा भेटले तो दिवस मी कधीच विसरणार नाही, पहील्या भेटीतच तो मला खुप आवडला होता… मी वैदेहीच्या नाचाची practice बघायला गेले होते, पुर्ण hall मधे त्याच्याखेरीज एकही मुलगा नव्हता… Auditorium च्या एका कोपर्यात बसून तो शांतपणे practice बघत होता..
Practice नंतर वैदेहीने आमची ओळख करून दिली. पहीली काही मिनीटं तो खुप शांत स्वभावाचा आसावा असं मला वाटून गेलं पण फ़क्त पहिली काहीच मिनीटं नंतर मात्र “किती बोलतो हा?” असच व्हायला लागलं.. .
आम्ही तीघही खुप वेळा एकत्र भेटायचो. तसा शोण मला एकट्यानं खुपच कमी वेळा भेटायचा.. . बहूतेक वेळेला वैदेही बरोबर आसायची. . .
शोण वैदेहीवर खुप प्रेम करतो हे मी आधीच ओळखल होतं आणि त्याने तसं एक दिवस माझ्याजवळ कबूलही केलं. . . एक दिवस … ज्या दिवशी वैदेही ने त्याला अथर्वबद्दल सांगितलं त्या दिवशी. . . खुप रडला तो माझ्या जवळ; मला वाटलं तो मला खुप चांगली मैत्रीण समजतो म्हणुन मोकळेपणाने रडला असेल पण मग असही वाटून गेलं की मीच काय पण कोणीही तीथे असतं तरी तो रडला असता. I was just lucky. ‘Lucky’ अस नकोना म्हणायला…
शोणच्या आयु्ष्यातली वैदेहीची पोकळी आपण भरून काढायची अस मी त्याच दिवशी मनशी ठरवलं होतं
पुढचे वर्षभर आम्ही भेटत रहीलो दोघचं. . .
जसजशी आमच्या भेटी वाढत गेल्या तसतशी मी त्याच्यात गुंतत गेले आणि शोण जास्तच कोरडा होत गेला…
मी आणि शोण आमच्या नेहमीच्या hotel मधे भेटलो. . .
शोण : काय हे तन्वी किती वेळ वाट पहायला लावतेस? कोणाला दाखवायला जायचं असल्यासारखं काय तयार होउन आली आहेस?
मी : काही नाही रे सहजच.. . (मी विषय टाळत म्हंटलं)
शोण नेहमी सरखी non-stop बडबड करत होता.. .
मी : शोण मला तुला कहीतरी सांगायच आहे…
शोण : बोलना मग.. . का माझ्या परवानगीची वाट पहतीयेस?
मी : शोण तु मगाअशी म्हणालासना कोणाला दाखवायला जायच आसल्यासारखी तयार होउन का आलीयेस? कारण मी त्यासाठीच तयार झाली आहे आज.. .
शोण : म्हणजे? कोणाला?
मी : उगाचे आता बनुनाकोस जस काही तुला समजतच नाही. . .
शोणने चेहरा अजुनच confused केला.. .
मी : मी तुझ्यासठी तयार होउन आले आहे शोण.. तु मला खुप आवडतोस.. . .
शोणने चेहर्यावरचे भाव न बदलता bill pay केलं आनि १ अक्षरही न बोलता निघून गेला.
रात्री ११-११-३० ला त्याचा phone आला. . .
शोण : “hello तन्वी?”
मी : हां शोण बोल.. .
शोण : जागी आहेस अजुन?
मी : आजच्या आपल्या भेटीनंतर मी छान शांत झोपेन असं वाटतं तुला?
शोण : हं . . . I am sorry मी असं वागायला नको होतं.… निदान माझ्यामनात काय आहे/नाही किंवा मला विचार करायला वेळ हवा असं तरी म्हणायला हवं होतं. . .
एक मोठा श्वास सोडुन शोण ने पुढे बोलायला सु्रवात केली. . . .
खरं सांगु तु काय सांगितलस हे मी ऐकुन आणि मला समजुनसुद्धा मला काहीच म्हणावस वाटलं नाही. . .
मी : म्हणजे????
शोण : म्हणजे काही नाही. . . मला तुला दुखवायच नव्हतं आणि मी exactly तेच केलं. . . माझ्या कडे हो/नाही कुठलच उत्तर तेंव्हाही नव्हत आणि अत्ताही नाहीये . . .
म्हणजे प्रेम ह्या भावनेशी माझा आता फ़ारसा संबंध नाही. . . मी प्रय्तन पुर्वक स्वत:मधे कोरडेपणा आणला आहे. . . .
एव्ह्ढच सांगायला phone केला होता.. . sorry….
आणि मला पुढे काहीही reaction देउ न देता त्याने phone ठेऊन दिला.. .
शोणच्या बोलण्याचा विचार करतच मला कधीतरी झोप लगली. . . .
दुसर्या दिवशी त्याचा परत phone आला.. .
शोण : तन्वी दुपारची २ tickets काढली आहेत मी १/२ तासात तुला pickup कारतो, आवरून ठेव.
मला हो/नाही बो्लायचीही संधीच मिळाली नाही. . .
कालच्या प्रसंगाचा त्याच्या वागण्यावर काहीही परिणाम झाला नव्हता….
शोण –वैदेही परत MBA साठी एकत्र आले त्यातच वैदेहीचं अथर्वशी breeakup झालं होतं मला सारख वाटायच की आता शोण तीला propose करेल पण त्यानं तीला कधीच मनातल्या भावना सांगितल्या नाहीत. . .
MBA संपलं , वैदेही Mumbai शोण Banglore असे वेगवेगळ्या शहरात गेले.. .
माझा त्या दोघांशीपण contact होता, वैदेहीने Mumbai ला गेल्यावर शोणशी contact हळुहळु कमी केला… का? माहीत नाही… पण माझ्याशी बोलतांना शोणची सारखी चौकशी व्हायची. . .
मला ही गोष्ट खुप खटकायची पण दोघांशी बोलुन काहीच उपयोग नव्हता ‘जाउ दे गं. .’ हेच ऐकाव लागायच.. .
घरी वैदेहीच्या लग्नाची बोलणीसुरू झाली, आणि एक दिवस वैदेही अथर्वला घेऊन घरी आली… त्यांच्या लग्नाची तरीख ठरली, मी शोणला कळवते असं उत्साहात वैदेहीला म्हणाले . . .
वैदेही : नाही त्याची गरज नाही . . .
मी : म्हणजे?
वैदेही : त्याला लग्नाला नाही बोलवायचय …
मी : का? (मी जरा चिडुनच विचारलं)
वैदेही : नाही बोलवायचे . . . बस्स . . .
मी : मला कारण कळल्याशीवाय नाही. . .
वैदेही : माझ्या आणि आथर्वच्या आधीच्या breakup ला शोण कारण होता आणि आता मी त्याच्याशी मैत्री ठेवलेली अथर्वला नाही अवडणार.
तरी वैदेहीच्या लग्नाची तारीख मी शोणला कळवली त्यानं फ़क्त बरं म्हणून phone बंद केला…
वैदेहीच लग्न खुप जोरात झालं…
मी माझं graduation संपवून नोकरी शोधत होते आणि माझं luck solid असलं पाहीजे मला banglore लाच नोकरी मिळाली.
मी आणि शोण पुन्हा भेटलो… एखादच वर्ष गेल असेल, जशी माझ्या घरी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरवात झाली तेंव्हाच मी शोणला परत मागणी घातली आणि to my surprise त्याने होकार सुद्धा दिला. पण मागची १-२ वर्ष लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख पण ठरत नव्हती… शोण ह्या ना त्या कारणाने तारीख ठरवायच लांबवत होता…
आगदी २-३ दिवसापुर्वीच आमची साखरपुड्याची तारीख ठरली… आणि मी अतिशय आनंदात वैदेहीला phone केला पण …
वैदेहीला समजावणं, सावरण हे माझ्या कडून शक्य होईना… शेवटी मी तिला शोणशी बोलं अस सांगितलं…
Taxi घरासमोरं येउन थांबली… मी त्याचे पैसे देऊन माझा खोलीत आले bed वर आडवी झाले पण I was lost आणि मला खुप insecure वाटायला लगलं होतं…
Chapter – 2
“शोण”
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
माझा फोन वाजला ‘दिलबर मेरे कबतक मुझे एसेही तडपाओगे ‘च्या ringtone वरुन मी ओळखल कोणाचा फोन आहे, पण Hows that? …
मी आश्चर्य करतच फोन उचलला. “Hello” म्हणायचाही अवधी न मिळता समोरून माला फक्त रडण्याचा आवाज आला…
“पिलु रडू नकोस, काय झालय सांग आधी” मी तीला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणालो. . .
‘वैदेही’ एक वेगळच रसायन… जिच्या नुसत्या हसण्यानेही कीत्येक आयुष्य जगल्याचा आनंद मिळायचा, प्रसन्नता ओसंडून वाहायची… साधारण ५’५” – ५’६” उंची गौरवर्ण. जराशी हट्टी, पण तितकीच समजुतदार. तिच्या गोल चेहर्यावर असलेले खट्याळ भाव, दोन्ही गालांवर पडनार्या गोड खळ्या, सुंदर लांब केस… सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या…
वैदेही : “मी काय करू शोण?” तिच्या प्रश्नानं मी पुन्हा भानावर आलो.
मी : “वैदु काय झालय सांगशील का आधी?… बोलणार आहेस का?… तु बोलल्यशीवाय माला कसं कळेल काय झालयं?”
वैदेही : “हं सांगते…”
पुन्हा कही क्षण तसेच गेले.. . वैदेही रडायची थांबली होती पण आजुनही काहीही बोलत नव्हती. . .
वैदेही : “मी चुकले… हरले आणि फसलेही…
म्हणजे?… मला अजुनही काहीही सुधरत नव्हतं…
वैदेही : मी तुला कसं सांगु?…
माझ्या मनात आता शंकांच वादळ सुरु झालं होतं.
वैदेही : ‘अथर्व’ मला परत सोडुन गेला रे…
मी : “असं काय झालं आहे वैदेही?” मी धक्यातुन सावरत तीला विचारलं.
वैदेही काहीच बोलत नव्हती आणि मी एकदम ५-६ वर्ष मागे गेलो. वैदेही आणि मी ‘दोन-जीव एक-प्राण’ निखळ मैत्रीच एक सुंदर उदाहरण…
खरं सांगायच तर मी कायमच तिच्यावर प्रेम करत आलो पण कधी सांगायची हिम्मत झली नाही… तिला हे महीत असावं ती कायमच हा विषय टाळायची. एक दिवस खुप धीर करुन सांगायच ठरवलं, माझ्या लक्ष्यात आहे त्या दिवशीचा क्षण अन क्षण …
१९९८ मधे कधी तरी
मी college मधे पोहचलो आणि वैदेही धावतच मझ्याकडे आली…
वैदेही : शोण… शोण मला तुला कही सांगयच आहे …
तीने माला खेचतच college च्या बहेर काढलं आम्ही नेहमीच्या hotel मधे बसलो आणि तिने बोलायला सुरवात केली.
वैदेही : ‘अथर्व’ ने मला propose केलयं… मी काय करू?
“हो म्हण” क्षणाचाही विलंब न करता मी उत्तर दिलं
‘अथर्व‘ आमचा २ years senior… college मधला ‘Most eligible bachelor’ कुठल्याही मुलीने त्याच्यावर भाळावं आशीच त्याची personality होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुप चांगल्या स्वभावाच होता.
मी स्वत:शीच हसलो , ज्या मुलीला मी आज सांगनार होतो ‘मी तु्झ्यावर खूप प्रेम करतो’ ती मलाच येउन विचारते ‘मी अमुक अमुक मुला बरोबर लग्न करू?’
‘अथर्व‘ मधे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं; वैदेहीने त्याला होकार दिला.
१९९९ मधे कधीतरी
१ वर्ष गेलं सग्ळ्या गोष्टी सुरळीतं सुरु होत्या. मी स्वत:ला समजावात वैदेहीच्या सुखात सुख शोधत होतो. पण एक दिवस मला ‘अथर्व‘चा phone आला. त्यानं मला भेटायला बोलावलं… मी आणि वैदु भेटायचो त्याच hotel मधे …
मी आणि आथर्व पोहचल्यावर ५ मिनीटातच वैदेही आली पण तिच्या चेहर्यावरचा आनंद उत्साह कुठेतरी हरवला होता.. .
Hi, Hello झाल्यावर थोडावेळ कोणिच काहीच बोललं नाही आणि शेवटी मीच शांतता भंग केली…
मी : “काय झालय अथर्व? वैदेही? आरे सांगा काय झालय ते…
अथर्वने एक मोठा सु्सकारा सोडला आणि बोलायला सुरवात केली…
अथर्व : We are breaking up… I am not going to stay with this girl anymore…. Bloody liar….
मी : काय झालय अथर्व? वैदेही कधीच खोटं बोलत नाही…
अथर्व : ती माझ्याशी खोटं बोलली… मला न सांगता ती त्या room-mate च्य भाव बरोबर movie ला गेली…
मी : आरे हे काय कारण आहे का break –up च? लहान आहात का आता?
अथर्व : नाही शोण लहान असण्याच प्रश्न येत नाही इथे, विश्वासाचा येतो. . .
अथर्व ने काहि तरि सांगण्याच प्रयत्न केला पण त्याल शब्द सापडत नव्हते.. .
अथर्व : शोण खुप छोट्या-छोट्या गोष्टी matter करतात प्रेमात.. .
म्हणजे? मी विचारलं. . .
अथर्व : कुठलही नातं हे खुप छोट्या-छोट्या घटनांचं एकत्रिकरण असतं, त्या घटनांचा आपल्यावर झालेला परिणाम असतं….
त्यानंतर तो खुपवेळ बोलतं होता, पण त्याल नक्कि काय सांगायच आहे आणि त्याच्या बोलण्याचा अथर्व-वैदेही यांच्या break-up शी काय संबंध आहे याचा मला काहीच आर्थवोध होत नव्हता… पण मी सगळ संयमपुर्वक ऐकत होतो, निदान तसं दाखवतं तरी होतो…
सगळ्या conversation च्या शेवटी अथर्व स्वत:चा निर्णय ऐकवुन निघुन गेला… वैदेही ला सोडुन…
कित्येक प्रश्न अन्नुत्तरीत ठेउन वैदेही पण उठुन गेली…
काय झालं होतं हे मला कधीच कळलं नाही, आणि मी पण ते जाणुन घेण्याचा प्रयत्नही केला नाही…
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
वैदेही : शोण तु ऐकतो आहेस ना?
वैदेहीच्या प्रश्नाने मी भानावर आलो…
मी : बोलं वैदेही मी ऐकतोय…
वैदेही : तु मला अत्ताच्या अत्ता भेटं. . .
मी : वैदु तु Mumbai मधे मी Bangalore मधे… कस शक्य आहे राजा? मी Friday च्या flight ने Mumbai ला येतो ठीक आहे?… पण निदान काय झालयं याची मला कल्प्ना तरी देशील का?
वैदेही : तु Friday ला ये मग़ बोलु आपणं. . .
वैदेही ने phone ठेउन दिला.. .
Friday ला अजून २ दिवस आहेत… मला कहीच कळेनासं झालं होतं. . .
‘अथर्व-वैदेही’ कळायला थोडंस अवघड नातं पण आज ते समजणं आवश्याक वाटतय…
‘वैदेही-अथर्व‘ च्या break-up नंतर २-२.५ वर्ष मी आणि वैदेही बरोबर होतो… मझ्या तिच्या बद्दलच्या feelings लपवत होतो तिला जपत होतो… आमचं B.E. संपलं आम्ही दोघानी एकत्रच एकाच college मधे MBA साठी admission घेतली.
MBA ची २ वर्ष मस्त गेली खुप धमाल, खुप मस्त्ती, खुप enjoy आणि खुप आभ्यास, campus placement सुद्धा…
मला Bangalore मधे एका MNC त job मिळाला तर वैदेही ला Mumbai मधे.. . ६ वर्षांनी आम्ही पहील्यांदा आणि कदाचीत कायमचे इतके लांब जाणार होतो…
वैदेही ज्या company त join झाली तिथेच अथर्व पण होता.. ते दोघे पुन्हा एकत्र आले त्यांनी रीतसर लग्नही केलं… वैदेही ने मला लग्नाला बोलावलं सुद्धा नाही…
Present Day
Friday office संपवुन मी flight ने Mumbai ला आलो आणि थेट वैदेहीला जाउन भेटलो… परवाच्या phone पेक्षा वैदेही बरीच शांत झाली होती…
वैदेही : ‘तन्वी’ नाही आली?
वैदेही चा पहिला प्रश्नच विषयाला सोडून होता.
‘तन्वी’ माझी होणारी पत्नी… आणि वैदेहीची मावस बहीण…
मी : नाही तन्वी नाही आली… वैदु काय झालं सांगशील का?
वैदेही : अथर्व is having an affair…
मी : काssssय?… मी जवळ जवळ किंचाळलोच…
“कोण आहे ती?” स्वत:ला सावरत विचारलं…
वैदेही ने माझ्याकडे एक रिकामी नजर टाकली…
वैदेही : त्याची college ची classmate आहे…
मी : कधीपासुन सुरु आहे हे?
वैदेही: कदाचीत लग्नाच्या आधी पसुनच…
मी : मग तुझ्याशी का लग्न केल त्याने?
वैदेही पुन्हा नुसतीच रिक्त हासली…
वैदेही : त्याने divorce papers तयत करायला सांगितले आहेत २-३ weeks मधे divorce होइल… ह्याच्याहून जास्त मी नाही सांगु शकणार शोण… Sorry… but I need your support…
मी : I am always there for you dear but I think I must know everything to give you correct suggestion and support
वैदेही ने नुस्तच “हं” केलं आणि पुन्हा थोड्यावेळ शांतता पसरली…
थोड्यावेळाने वैदेहीने बोलायला सुरवात केली…
वैदेही : I guess you are right… सांगते… शोण तुला आठवतय Athatva and I had a break-up in our college…
मी : वैदु तु मला तेंव्हाही करण सांगितलं नाहीस…
वैदेही : आज सांगते, तुला ते माहीत आसायला हवं, खरं तर तेंव्हाच सांगायला हवं होतं, पण नाही सांगु शकले
मी : म्हणजे.. .?
वैदेही : आमचं break-up तेंव्हा आपल्या मैत्री मुळे आणि त्या आनन्या मुळे झालं…
मी : काsssssssय? मला हा फारच मोठा धक्का होता…
अनन्या अथर्वची classmate ५’८” ५’९” उंची घारी-गोरी लांब केस solid sexy figure थोडक्यात आमच्या college ची hot property होती ती…
वैदेही : अथर्वला आपली मैत्री खटकत होती…
खुप आश्चर्य, shock, आणि बर्याच भावना माझ्या चेहर्यावर एकत्र होत्या पण मला कहिही बोलायला सुचलं नाही.
वैदेही : “शोण अरे”… वैदेहीने पुन्हा रडायला सुरवात केली…
खरतर मी तिला शांत करायला हवं होतं पण मी फक्त तीच्याकडे बघतच राहिलो…
थोड्यावेळाने वैदेही रडायची थांबली, आणि डोळे पुसुन तिने पुढे बोलायला सुरवात केली…
वैदेही : अथर्वला आपलं नातं कधीच समजलं नाही… त्याला वाटायचे की you were in love with me, पण तु कधे ते बोलुन दखवत नाहीस…
माझा चेहरा खाडकन उतरला… पण स्वत:ला सावरत शक्य तिताक्या कोरड्या आवाजात मी विचारलं “पुढे?”
वैदेही : आथर्वला वाटायच की मी पण तुझ्यावर प्रेम करते… And that was not completely wrong…
मला हा अजुनच मोठा धक्का होता…
वैदेही : मी अथर्व कडे ही गोष्टं कबुल केली… that I was in love with you but you did not ask on time… आणि मी स्वत:ला तुझ्यापसुन वेगळ करत गेले… आणि मग मी अथर्वला भेटले…
काही क्षण तसेच गेले…
ती शांतता माझा जीव घेत होती तेव्ह्ढ्यात वैदेही ने परत बोलायला सुर्वात केली…
वैदेही : मी अथर्वला हे सांगितल्यावर थोडे दिवस तो नीट वागला.., आणि मग़ छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडायला लगला… तुझ्यावरुन चिडवणं, टोमणे मरणं वगैरे सुरु झालं, एकीकडे तो तुझ्यावरुन मला बोलायचा आणि दुसरीकडे आनन्या बद्दल मे काही बोललेलं त्याला चालायचे नाही… मला कळतच नव्हतं मी कस वागु ते…त्यातच मे त्याच्या बरोबर movie ल गेले नाही आणि शिल्पाच्या भावा बरोबर गेले… अथर्वने ह्या गोष्टीचा खुप issue केला आणि हेच कारण पुढेकरुन मला तोडलं…
पुढची 2-2.5 वर्ष आपण एकत्र होतो पण पुन्हा तु मनातलं काहीच कधीच बोलुन दखवलं नाहीस…
मी Mumbai ला JP join केलं आणि मला परत अथर्व भेटला. इतक्या वर्षांनी त्याला समोरपाहून मी थोडी सुखावले… तो माझ्याच team चा manager असल्या मुळे रोजची interaction व्ह्ययची हळूहळू जुन्या जखमा नव्याने वहायला लगल्या आणि आम्ही पुन्हा एकमेकांना commit केलं… पण तेंव्हा मी त्याला वचन दिलं की मी तुझ्याशी काहीच contact ठेवणार नाही आणि तोही आनन्याशी contact ठेवणार नाही… आणि म्हणुनच तुला साधं निमत्रण सुद्धा मी पाठवलं नाही… इतकच काय तर तन्वीला पण सांगितलं की तुला बोलवायच नाही…
पहीली १ वर्ष छान गेलं पण आमच्या एका trip च्या वेळी अनन्या भेटली… खरतर मी तिच्याशी बोलुन अथर्व वर विश्वास ठेवायचा ठरवला…
पण अत्ता काही दिवसांपुर्वी मी Singapore Tour हून परत आले तर ‘आनन्या’ घरी होती. . .
वैदेहीने मोठा pause घेतला.. . एक सुस्कारा सोडून तीने पुन्हा बोलायला सुरवात केली. . .
वैदेही : आम्च्या break-up नंतर अथर्वच आनन्याशी affair होतं but she dumped him for her carrier. ती MS करायला गेली. . . आणि ही गोष्ट मला सांगण अथर्वला जरुरी नाही वाटलं
त्या trip पासुन हे दोघही रोज भेटायचे… अथर्व कधी माझ्यापासुन दुर गेला हे माझं मलाच कळलं नही. . .
८ दिवसांपुर्वी त्याने माझ्याकडे divorce मागितला. . .
एव्हढं बोलुन वैदेहीने पुन्हा रडायला सुरवात केली. . . . आणि मी फक्त बघत होतो शुन्यात.
Chapter – 3
“अथर्व“
२००५ मधे कधीतरी
“वेदा . . . वेदा . . . ए उठ ना.. . .” मी वेदेही ला उठवायचा खुप प्रयत्न केला पण ही ढिम्म हालली तर शपथ… शेवटी मीच गादीतून बाहेर आलो, instant coffee बनवली आणि खिडकीत जाऊन उभा राहीलो. . .
नजर जाईल तिथंपर्यंत बर्फच बर्फ, उंचच्या- उंच हिम शिखरं आणि त्यावर चकाकणारं सुर्याच ते कोवळं ऊन. . . उगाच कश्मिरला प्रुथ्वीचा स्वर्ग म्हणत नाहीत.. . मी विचार करता करता कधी भुतकाळात हरवलो ते माझं मलाच कळलं नाही. . .
१९९८ मधे
माझं T.E. च वर्ष सुरु होऊन महीना झाला असेल… आज पासून F.E. चं college सुरु व्हायच होतं म्हणुनच college ला full quorum होता…
मी आणि माझी gang बाहेर कट्यावर, नवीन प्रत्येक मुला-मुलींची निरीक्षण आणि विश्लेशण करत बसलो होतो. उगाच ‘नाव विचार, maarks विचार मग एखादं वाक्य उलट म्हणुन दाखव’ असलं फालतु Ragging चालु होतं. त्या सगळ्या भेदरलेल्या मुला-मुलींच्यामधे असा एकच चेहरा होता ज्या चेहर्यावर भीतीतर नाहीच पण माजच होता… म्हणजे मला तो माज वाटला पण माझ्या ganag ला मात्र तो confidence वाटला…
मी त्या मुलीला मझ्याकडे बोलावलं
मी : नाव सांग.. .
मुलगी : कोण तु? मला कशाला बोलावल आहेस?
माझे सगळे मित्र-हसायला लागले.. . .
मी : मी तुझा senior आहे. So call us sir! आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे…
मुलगी : “वैदेही” ! प्रश्नांची उत्तर देण्यापर्यांत ठीक आहे पण “Sir” जमणार नाही, आणि आता मला तुमची नावं सांगा.. . हं तुझ्या पासुनच सुरवात कर…
तिच्या बोलण्याने आम्ही सगळेच गार पडलो होतो. . . आम्ही आपापली नाव सांगितली…
वैदेही : मुलींची ओळख करुन घ्यायचे नवीन उपाय शोधा आता… मुलींची ओळख ही ‘ओळाख करुन घ्यायची आहे’ अस सांगुन करून घ्यावी, म्हणजे ती पद्धात मुलीना रुचते आणि त्या ओळखीला अर्थही असतो…
आम्हाला सग्ळ्यांना shock देउन वैदेही शांतपणे निघुन गेली…
जशी वैदेहीची ओळख आम्ही करुन घेतली तशीच शोणची सुद्धा ओळख झाली…
शोण तसा तो हुशार पण खेळ आणि extra activities मधेच जास्त असायचा… त्याच्या आणि वैदेहीच्या मैत्री बाबत मी कायमच ऐकायचो खुप राग यायचा साल्याचा…
वैदेही . . . पहील्या भेटीतच ती मला आवडायला लगली होती.
१९९९ च्या मध्यास
अनन्या : अथर्व . . . ए झोपतोयस काय उठ उद्या आपला final paper आहे ना? उठं!
अनन्याने मला हलवून हलवून जाग केलं…
मी : अने काय ग…! कसलं मस्त romaantic स्वप्न बघत होतो मी…
मी जरा चिडचीड करतच उठलो…
अनन्या , आम्च्या college ची सगळ्यात सुंदर, sexy आणि फटाका पोरगी, आणि माझी best friend; इतकी close की तीचं आणि माझं affair आहे असचं सगळ्यानां वाटायचं, आणि आम्ही दोघही त्यांची खात्री व्हावी असेच वागायचो . . .
अनन्या : काय रे कोणाच स्वप्नं ? माझं की वैदेहीचं?
मी : ए तुझी स्वप्न पहायचा कंटाळा आला आहे आता, so now the new girl, वैदेही!
अनन्या : “तुझ्या XXXXXXX “
अनन्याने एक आर्वाच्य शिवी घातली आणि मला हसु आलं. . .
चल आभ्यासाला बसू. . . तिने विषय बदलला.. . .
Last paper देऊन बाहेर आलो आणि स्व्त:शीच म्हणालो “Wow T.E. complete झालं, Now start preparing for Campus!”
मी पेपर देऊन बाहेर पडल्यापासूनच वैदेहीला शोधत होतो. . . ती as usual study मधे आभ्यास करत होती. . . त्यांची PL चालू होती, ती आणि शोण college च्या study मधे अभ्यास करायचे . . .
वैदेही : हं बोल मला अभ्यासाला जायचं आहे, शोण आणि स्वप्निल study मधे वाट बघता आहेत.. .
वैदेही खुप घाईत असल्याच दाखवत होती. . .
“कसं सांगु ?” हा प्रश्न माझा मलाच सोडवायला लागणार होता…
वैदेही : कुठे हरवला आहेस? आणि propose करायला आल्यासारखा का लाजतो आहेस?
ती माझी टांग खेचत म्हणाली. . .
मी : कारण मी तुला propose च करायला आलो आहे.. .
मी खुपच सरळ उत्तर दिलं. . . .
वैदेही : आता तु माझी टांग खेचतोयस का?
मी : नाही, I am very much serious !
वैदेही : हं ठीक आहे, मला विचार करायला थोडा वेळ हवा…
एव्हढ बोलुन ती निघुन गेली…
Exam संपल्यावर मी तीला परत propose केलं आणि finally We were couple…..
मी, वैदेही आणि अनन्या असा आमचा triangle झाला होता… मी आणि वैदेही आता commetted आहोत ही गोष्टं मी अनन्याला सांगणं टाळलं आणि त्या दोघींना एकमेकींपासून सुद्धा दूर ठेवलं…
सुट्टी फार भारी गेली, मी आणि वेदा रोज भेटायचो किती तरी तास नुसतेच भटकायचो, कधी trek , कधी long drive , movie….
एकदा असच movie ला गेलो होतो आणि अनन्याने आम्हाला बघितलं, दुसर्या दीवशी अनन्याने मला चांगलाच फैलावर घेतला आणि मी तीला खरं सांगितलं. . . .
अनन्या खुप रडली. . .
अनन्या : तु मला फसवलसं अथर्व.. . .you have hurt me, तु एकदा सुधा माझा विचर केला नाहीस? How could you? … I love you god dam it…..!!!
मान खाली घलून ऐकण्याखेरीज मी कहीच करू शकत नव्हतो . . .
अनन्या निघून गेली पण मला अस्वस्थ करून गेली. . . .
सध्यांकाळी मी वेदाला झालेला प्रकार सांगितला…
वैदेही : तु पुन्हा तिच्याशी contact ठेवणार नाहीयेस अथर्व . . . ती खुप थंड पणे बोलायचा प्रयत्न करत होती. . . पण तीचा राग़ लपत नव्हता…
मी : मग तु पण शोणशी संबंध तोड! (मी तीतकाच शांत पण कठोर आवाजात बोललो)
वाद कसा वाढत गेला आम्हा दोघांनाही कळलं नाही, शेवटी compromise झालं मी अनन्याला आणि वेदाने शोणला college बाहेर भेटायच नाही…
Compromise झालं पण कुठेतरी तडा गेला होता . . . कदाचीत कायमचाच . . . .
२००५ मधे
वैदेही : “Good Morning”
वेदानं मला परत वर्तमानात आणलं
वैदेही : कायरे Honey moon ला सुद्धा बयकोखेरीज कोणाच विचर करतोयस?
तीने माझी चेष्टा करत विचारलं. . .
मी : काही नाही गं आपण कसे भेटलो, प्रेमात पडलो, भांडलो , वेगळे झालो आणि आता परत एकत्र आलोय लग्न पण केलय, and we are on Honey moom for the second time…. ह्याच सगळ्याच विचार करत होतो. . .
वैदेही : बरं आता वर्तमानात आलात का आपण? मग आता आवरा कश्मिर दर्शनासाठी जाउया.. . .
हे आमचं 2nd Honey moon होतं, वेदा खुप खुश होती. . . आणि मी सुद्धा . . .
भरपुर भटकून आम्ही एका छोट्या hotel मधे कश्मिरी चहा (Kawa) प्यायला थांबलो. गाडीतुन उतरलो तर समोर अनन्या.. . मी 2 minute shock state मधेच होतो. . . अनन्याने तिथेच रस्त्यावर मला hug केलं, आमचे नविन numbers exchange झाले आणि आम्ही गाडीत बसलो. . .
वैदेही : Driver, अब गाडी सिधा hotel लेके चलो, हमे और कुछ नही देखना है!
वेदाने चिडचिडतच हुकुम सोडला.. . मी driver ला नुसतीच खुण केली आणि आम्ही hotel कडे निघालो, गाडीत वैदेही माझ्याशी एक अक्षरही बोलली नाही. . . Hotel ला पोचलो, वेदाने change करतांनाच ओरडून सांगितलं “मला काही बोलायच नाहीये!’
मी seating room मधे TV बघत बसलो होतो पण मन मात्र पुनः-पुन्हा आठवणींकडे जात होतं.
१९९९ मधे कधीतरी
त्या दिवशीच्या वादानंतर खरच आम्ही दोघांनीही अनन्या आणि शोण यांना स्वतः पासून लांब ठेवलं, पण फार दिवस नाही, अनन्याने परस्पर project Partner म्हणुन माझं नाव देउन टाकलं, आणि याचा बदला म्हणुन की काय कुणास ठाउक पण वैदेही ने शोणलाच Lab partner केला… हळुहळु ह्यावरून होणार्या वादाचं रुपांतर खडाजंगी भांडणात व्हायचं…
आमची भांडणं वाढली आणि ‘Project Work’ मुळे अनन्याचा सहवासही वाढला.. . . किती Confused होतो मी. . . .
Few days later
मी : वेदा मी उद्याची २ tickets काढली आहेत ६ च्या show ची
वैदेही : तु मला न विचारता का कढलीस? त्या अनन्यालाच घेउन जा मला उद्या काम आहे.. . .
वेदाने विषयच संपवला.. .
मी आणि अनन्या जरा उशिराच theater ला पोचलो. . . Interval मधे वेदा दिसली पण बरोबर शोण नव्हता.. . आम्ही तिथेच भांडलो. . .
दुसर्या दिवशी वेदानेच मला call करून भेटायला बोलवलं.. .
आम्ही नेहमी सारखे कट्ट्यावर भेटलो पण आजच भांडण नेहमी सारख नव्हत…
खुप दिवस मी breakup चा विचार करत होतो. . . आणि तो माझ्या तोंडून बाहेर पडुन गेला.. .
मी वैदेही-शोण या नात्याबद्दलही बरच काही बोलून गेलो. . . .
वैदेही : तुझा माझ्यावर विश्वासच नसेल तर आपल्या नात्याला काय अर्थ उरला?
हरलेल्या आवजत वेदाने प्रश्न केला.. .
मी : वैदेही नुसताच विश्वासाच प्रश्न नाहीये, आपण एकमेकांना compatible नाही आहोत.. . You are not of my kind or vice versa you can say, आपण वेगळ होणच योग्य.. .
२००५ मधे
“Room Service” ने मला उठवलं. भुतकाळात हरवलेल्या मला, त्या couch वर कधी झोप लगली तेच कळल नाही. . . .
मी Bed Room मधे गेलो तर वेदा रूम मधेच नव्हती hotel reception ला call करून विचरल तर madam सकाळीच बाहेर गेल्या आहेत एव्हढीच माहिती मिळाली…
काल अनन्या भेटल्या पसून ती खुप disturbed होती, सहाजीक आहे… आमच्यात परत भांडणाला सुरवात होणार की काय असा विचार करत असतांना वैदेही आणि अनन्या दोघीही रूम मधे आल्या…
त्या दोघींना एकत्र पाहून माझ्या डोल्यासमोर काजवेच चमकले…
पण कालच्या मनाने वैदेही शांत वाटत होती. . . वैदेही ने बोलायला सुरुवात केली. . . .
वैदेही : “I am sorry Atharva!”, तुमचं affair होतं आसा माझा कायमच संशय होता आणि हेच आपल्या आधीच्य भांडणाचं महत्वाच कारण होतं असा माझा समज होता.. .
काल Hotel वर परत आल्यावर मी खुप विचार केला आणि आज अनन्याल भेटले.. . तरी आपण ठरल्या प्रमाणे अनन्या आणि शोण दोघांशी contact ठेवणार नही आहोत आणि ही गोष्ट मी मुद्दाम अनन्या समोरच सांगते…
मी आधीची भांडणं, नंतरच suffering सगळ मुश्किलीने विसरले आहे, मला परत-परत त्याच गोष्टींचा त्रास नकोय…
वैदेहीचा प्रामाणिक पणा आणि मझ्यावर वि्श्वास दाखवायची तयारी पाहून मी फारच थक्क झालो… तिचा हा विश्वास खरतर खुप समाधान देणारा होता पण मी तिच्या ह्या विश्वासाला खरच पात्र होतो का?
Honey moon संपल.. . आणि routine सुरु झालं, रोजचे घाण्याला जुपलेले बैल…
मी आणि वेदा एकाच company मधे असलो तरी वेगवेगळ्या branch मधे होतो आणि अनन्याच office अगदी माझ्या office शेजारीच होतं… मी आणि आनन्या त्यामुळे lunch ला रोजच भेटायचो पण कामाचा व्याप इतका वाढला की मी आणि वैदेही रात्री जेवतांना पण भेटायचोच अस नाही… कितीदा तरी मी घरी येइ पर्यन्त वेद झोपलेली असायची…
मी परत वेदा पसून दुर जात होतो आणि अनन्या माझ्या तितकीच जवळ येत होती… पुन्हा तीच चक्र फिरू लागली, मुळात मी आणि वैदेही एकमेकांना वेळ देउ शकत नव्हतो आणि एकत्र वेळ मिळालाच तर वाद आणि भांडण याच्या पलीकडे संवाद जायचा नाही.
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
माझी आणि अनन्याची involvement इतकी वाढली होती की वैदेही tour ला गेली की अनन्या हमखास घरी यायची . . .
मी : तुला तुझं carrier महत्वाच होतं ना मग आता परत का अनन्या ? तेंव्हा तु मला commitment द्यायला नकार देउन गेलीस…
मला मधेच तोडत अनन्याने बोलायला सुरुवात केली
अनन्या : मी sorry म्हणाले ना? मग?
मी : पण आता माझ लग्न झालयं! आता हे शक्य नाही. . . माझं तुझ्यावर अजुनही प्रेम आहे, त्या प्रेमासाठीच मी एकदा वैदेहीशी breakup केलं होतं, पण आता नाही, मग आता आहे तस चालु दे ना…
अनन्या : मला तुझ्यासाठी अजुन फार दिवस नाही थांबता येणार अथर्व; नीट विचार कर आणि ८ दिवसात सांग तुझा काय decission आहे ते…
अनन्याने हे वाक्य संपवलं आणि door bell वाजली…
मी : Oh shit…! मी विसरूनच गेलो तुला airport वर घ्यायला यायच होतं . . .
मी दार उघडलं आणि समोर वैदेहीला बघून म्हणालो . . .
वैदेही : Its Ok…अनन्या आलीये?
दारतल्या sandels कदे बघत वैदेहीने विचारलं. . . माझ्या पडलेल्या चेहर्याकडे लक्षही न देता वैदेही bed-room मधे गेली….
पुढचे २ दिवस अनन्या मला भेटली नाही आणि वैदेही माझ्याशी काही बोलली नाही. . . .
Two days later
वैदेही : आज अनन्या आली होती office मधे, आम्ही lunch एकत्र केला.. .
मी (खुप कोरडेपणा आवजात ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो) हं मग?
वैदेही : तिने मला सगळ सांगितल आहे. . . Before our marriage You had an affair with her आणि तु ते मला नाही सांगितलस? . . .
वैदेहीने एक मोठा सुस्कारा सोडला आणि पुढे बोलायला लागली. . .
वैदेही : तुझ्याकडे २ दिवस आहेत अथर्व, तिच्याशी संबंध पुर्णपणे तोड आपण नव्याने सुरुवात करू. . . . तुझा decision झाला की मगच माझ्याशी बोलायला ये . . . .
वैदेहीने डोले पुसले आणि झोपायला दुसर्या खोलीत निघुन गेली. . . .
Next Day
मी : मी माझ्या वकिलांनाशी बोललो आहे आणि मी त्यांना आजच divorce papers तयार करायला सांगितले आहेत.. . आपण सह्या केल्या की आपण आपापल्या मार्गाने जायला मोकळे, तुझी २ दिवसाची मुदत संपायला अजुन आवकाश आहे…
एव्हढं बोलुन मी घरा बाहेर पडलो… वैदेहीच्या चेहर्याकडेपण बघायची माझी हिंमत नव्हती…
Chapter – 4
“वैदेही”
२००४ मधे कधी तरी
“I am the luckiest girl in the world!” मी bandstandच्या किनर्यावर जवळ-जवळ ओरडतच होते… अथर्वने परत लग्नाची मागणी घातली…
आम्ही एकमेकांवर अत्तातरी खुप प्रेम करतोआणि लग्नाला हे पुरेस कारण आहे? अथर्व समोर दगडावर बसून फक्त माझ्याकडे बघत होता… मी माझा आनंद कसा आणि किती व्यक्त करू हेच मला कळत नव्हतं…
मी अथर्वच्या मांडीत डोकं ठेवलं आणि डोळे मिटले…
१९९७
माझ्या college चा पहिला दिवस होता मी पुण्याला B.E. साठी आले होते, ‘नांदेड’ सारख्या छोट्या शहरातून पुण्याला… तसं मनावर थोड दडपण होतं पण college मधे पोहोचले आणि कुठलिशी energy माझ्यात संचारली. . .
College च्या gate वर senior मुलांचा घोळके उभे होते, आमचं Ragging करणार म्हणे.. .
अशाच एका घोळक्यातून एका मुलाने मला बोलावलं, घाबरायच नाही म्हणुन मी जरा अगाऊच उत्तर दिली. . .
एका मुलानं मला “ तुझं नाव सांग. . .” असा हुकुम केला यावर मी माझ नाव सांगितलं पण त्यांनचही Ragging घेउन तिथुन class मधे येऊन बसले… ही माझी आणि अथर्वची पहिली ओळख.. . .
‘अथर्व‘ टपोरी पोरांमधे बसला होता तरी तो टपोरी वाटत नव्हता.. . आणि तो college चा topper होता हे मला नंतर समजलं. . .
मी class मधे येऊन बसले हळूहळू ओळखी होत होत्या… सगळ्या मुली एका बाजुला आणि मुलं एका बजुला . . . शाळेत बसल्यासारखे सगळे बसले होते… मी मात्र मधल्या row चा last bench पकडला… 1st lecture संपल आणि एक ५’८” – ५’१०” उंचीचा एक माणुस हातात कसली तरी file घेउन शिरला… बहूदा next lecture चे sir असावेत म्हणुन सगळे उभे राहिले तर हा पठ्या थेट माझ्या शेजारी येउन बसला.. .
“अगं बस खाली, मी Prof नाही, एक student आहे.. . त्याने बोलायला सुरवात केली. . . . “मी शोण.. . तु ?”
“वैदेही” . . . मी उत्तर दिल …
शोण : हं छान नाव आहे . . . वैदेही . . . .!
त्याने उगाचच complement दिली. . . .
एक आठवड्यातच आमच्या Practicle batches लागल्या, मी आणि शोण एकाच batch मधे होतो . . . .
हळूहळू आमची मैत्री वाढली आणि आम्ही इतके छान मित्र झालो कि एकत्र अभ्यास करणं आणि मी शोणच्या flat वर उशीरा पर्यंत असणं हे काही नवीन राहीलं नव्हतं…
अथर्व मला रोज भेटायचा कधी class च्या बाहेर, कधी canteen मधे तर कधी library मधे पण रोज भेटायचा काहीवेळा तर वाटायच की तो मुद्दाम भेटण्यासाठी कारण काढतो . . .
आमच FE संपत आलं होतं. मी, शोण आणि अजुन १-२ जण study मधे बसलो होतो आणि तेंव्हाच मला अथर्वने बाहेर चोलावून घेतलं.
अथर्व तसा joly nature चा होता पण orthrodox वाटायचा आणि तसा तो होता ही. . . आम्ही खुपवेळा दोघच canteen मधे बसायचो lecture bunk करून. मला त्याचं बरोबर असण आवडायचं. . .
मी study तून बाहेर आले,
मी : हं बोल काय झालं?
अथर्व कहीच बोलत नव्हता.. .
मी : अरे ते दोघं माझी वाट पाहतायत. . . मी अभ्यास सोडून आले आहे.. .
अथर्व नुस्ताच शब्दांमधे घुटमळत होता.. शेवटी मी त्याची टांग खेचायला म्हणून विचारलं
मी : अरे किती गोंधळला आहेस? शब्द हरवले आहेत का तुझे? का मला propose करायला आला आहेस?
माझ्या ह्या प्रश्नावर अथर्व चांगलाच दचकला, आणि एक मोठ्ठा श्वास सोडून म्हणाला.. .
अथर्व : हं मी तुला propose करायलाच आलो होतो. . . .
मला क्षणभर काही सुधरेचना.. . हा खरं बोलतोय की माझीच टांग खेचतोय.. . पण तसा तो serious वाटत होता.. .
मी : हं मला थोडावेळ दे . . . येते मी. . .
मी विषय संपवून तिथून निघाले.. .
माझं अभ्यासात अजीबात लक्ष लागत नव्हतं आणि शोण मला रागवुन रागवुन अभ्यास करून घेत होता.. .
माझं confusion मात्र टोकाला पोहचलं होत.. . मला शोण मनापासून आवडायचा, माझा तो सगळ्यात जवळचा मित्र होता पण life partner म्हणुन.. . मला खरच कळत नव्हत… एक तर शोणच्या मनात काय आहे हे माहीत नाही, आणि समजा मीच त्याला विचारलं तर. . .? आणि तो नाही म्हणाला तर? तर मी एक मित्र गमावुन बसेन कायमचा कदाचित.. .
दुसरीकडे अथर्व.. . आम्ही खुप close friends नसलोतरी I always felt “we have some chemestry” . . .
मी अथर्व बद्दल शोणचा सल्ला घ्यायचा ठरवलं. . .
आमचा FE चा last paper होता … मी शोणला जवळ-जवळ खेचत college बाहेर काढलं, आम्ही आम्च्या fevourate joint ला आलो…
शोण : वैदु मागचे काही दिवस तु lost वाटतीयेस.. . काय झालय?
शोणने coffee चा sip घेत विचारलं. . . .
मी : हं खरय तुझं म्हणणं, पण तु तर मागचे ६ महीने lost आहेस त्याच काय?
मी उगाच त्याची wicket घेतली… शोणचा चेहरा बघण्यासारखा झाला होता…
शोण : अं . . . नाही ग.. . काही नाही. . .!
शोण अडखळत म्हणाला आणि त्यने विषय बदलत मला विचारलं. . .
शोण : पण तु सांगना तु का lost आहेस ते.. .?
थोडावेळ दोघही नुसतेच शांत बसून होतो. . . . मग मी बोलायला सुरवात केली. . . .
मी : अं… मला अथर्वने propose केलयं…, मी काय करू ? मला तो आवडतो आणि he can understand me well… I think… He’ll be a good life partner…. मला तुझा सल्ला हवा आहे…
शोण : हं . . . त्याच्या आणि अनन्याबद्दल बरच ऐकलय, तो तुला काही बोलला का?
मी : ‘अनन्या त्याची हुप चांगली friend आहे . . . जसे आपण दोघं तसेच ते दोघं. . . .
शोण : हं. . . तुला तो आवडतो . . . . but do you love him?
मी थोडावेळ काहीच बोलले नाही , शोणने खुपच अवघड प्रश्न विचारला… आणि थोड्यावेळाने मी नुसतीच मान डोलावली… होकारर्थी कि नकारार्थी ते माझ मलाच कळलं नाही… पण शोणने त्याचा अर्थ होकारर्थी असा काढला असावा…
शोण :if you love him वैदु, हो म्हण त्याला.. . नाही म्हणण्यासारख काहीच नाहीये… “Always maary a person who loves you, rather than waiting for some one whom you would love; simply b’coz this person will always know ways to keep you haapy and o.w. you will have to find ways to keep him/her happy!”
मला त्या रात्री झोप लागत नव्हती; छताकडे बघत नुसतीच पडुन होते.. . आणि शोणच्या बोलण्याचा विचार करत होते…
सकाळी सकाळी अथर्वचा phone आला…
अथर्व : Good Morning! वेदा…
मी : Good Morning ! आणि वैदेहीच वेदा का…?
अथर्व : वेदा… तुला नाही आवडल? नाही म्हणणार …
अथर्व थोडा नाराजीच्या स्वरात बोलला…
मी : तोंड नको पाडूस लगेच तु काहीही म्हण.. . मला ते छानच वाटेल…
अथर्व : Good तु मला भेटतीयेस?
मी : हो मला पण तुझ्याशी बोलायच आहे.. . कुठे भेटायच?
अथर्व : अं… माझ्या घरी चालेल? आपल्यला शांत बसून बोलता येइल माझ्या room मधे …
मी : ठीक आहे १ तास भरात येते…
मी अथर्वच्या घरी पोहचले अथर्वने प्रसन्न चेहर्याने दार उघडलं, त्याच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहात होता… आम्ही त्याच्या Room मधे आलो. खोलीचे पडदे पाडलेले होते पण दोन मंद दिवे चालू होते, त्यने पडदे उघडले आणि दिवे बंद करत मला विचारलं
अथर्व : काय घेणार? Coffee की juice ?
मी : नको काही नको बस तू…
अथर्व : हं बोल तुला काय बोलायच आहे? (bed वर बसत अथर्व म्हणाला)
मी: तुझ्या propose बद्दल… तु serious होतास की उगाच माझी wicket…
मला मधेच तोडत अथर्वने बोलायला सुरवात केली…
अथर्व: Seriously I am in love with you…!
मी : हं . . . आणि अनन्या?
अथर्व : तीच काय? ती माझी चांगली मैत्रिण आहे त्याहून जास्त नाही. . . sorry to say पण तू सुद्धा इतरांसारखाच विचार केलास…
मी : हं ठिक आहे.. . आता मस्त coffee आण . . . तुला करता येते की मी करायची?
अथर्व : मला येते पण तुच कर.. .
आम्ही kitchen मधे आलो अथर्वने सगळ्या गोष्टी काढून दिल्या . . . मी coffee फेटतांना विचारल.. .
मी: घरी कुणी नाही?
अथर्व : नाही Mom-Dad दोघेही office aaNi बहीणाबाई trek ला गेल्या आहेत So team च घर आणि साजरं कर.. . .
मी : म्हणजे पुर्ण planning करून मला बोलावल आहेस तर. . .
मी coffee Mug मधे ओतत म्हणाले.. .
अथर्व नुसताच हसला.. . . आणि म्हणाला “चल वर माझ्या Room मधेच बसू!”
आम्ही परत वर आलो, त्याने पुन्हा पडदे सारले ते छोटे दिवे लावले आणि मस्त romantic गाणी लावली… माझ्या हाततला cup घेउन बाजुला ठेवत म्हणाला… “May I have the pleasure of the dance?”
मी हात त्याच्या हातात देत उभी राहीले. त्याने माझे दोन्ही हात स्वतःच्या खांद्यावर ठेवले, माझ्या कंबरेला धरून मला जवळ ओढलं … माझ्या कानाशी येऊन हळूच म्हणाला “तु अजुनही तुझ्या मनात काय आहे ते सांगितलं नाहीस . . . but I love you…” मी डोळे मिटून घेतले आणि तितक्याच हळू आवाजात , थोडस लाजत म्हणाले… “Love you too”
२००४ मधे कधी तरी
“चल वेदा” अथर्व मला उठवत होता आणि मी पुन्हा वर्तमानात आले…
अथर्व : चल बराच उशीर झाला आहे , तुला घरी सोडुन मग मला घरी जायच आहे…
आम्ही उठून त्याच्या car च्य दिशेने चालायला सुरवात केली . . .
माझा मगाचा आनंद आता जरा शमला होता . . . आणि मनात मात्र एकच विचार होता . . . “मी आणि अथर्व पुन्हा एकत्र आलोय पण मागल्यावेळेसारखच झालं तर ?” माझ्या मनातल्या शंकाना band stand चा समुद्र स्द्धा आपल्या लाटांच्या आवाजाने दुजोरा देतोय असच क्षणभर मला वाटून गेलं…
अथर्वने मला माझ्या flat वर सोडलं आणि मी room मधे जाउन आडवी झाले… आज शोण ची खुप आठवण येतीये, माझ्या आयु्ष्यातला सगळ्यात मोठा decision त्याच्या सल्या शिवाय मी घेत होते . . . मगच्या ६-७ वर्षात पहील्यांदाच . . . आणि इथुन पुढे कायमच.. . मला रडायला येत होतं. . . . रडता रडता कधी झोप लागली कळलच नाही. . .
१९९९ मधे
अथर्व : तु शोणशी बोललेलं मला खपणार नाही. . . मला तुझी आणि त्याची मैत्री नाही आवडत. . .
अथर्व जवळ-जवळ माझ्यावर ओरडतच होता…
आम्ही एकमेकांना commit करून २ महीने पण नव्हते झाले आणि …
मी खुप शांतपणे त्याच बोलण ऐकत होते. सु्ट्टी संपुन college सुरु झालं होतं आणि college मधला माझा बराच वेळ शोण बरोबर जात होता आणि हीच गोष्ट अथर्वला खटकत असावी. . . .
मी: ठीक आहे मी शोणशी बोलणार नाही… पण आम्ही एकाच class मधे , practical batch ला , so कितीही ठरवलं तरी आमने-सामने येणारच मग..? आणि जस तुला आमच नातं खटकतं तसच मला तुझं आणि अनन्याच नातं खटकत.. . पण माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुमच्या मधे मैत्री पलीकडे काही नाही ही गोष्ट मी स्वतःला खुप समजावत आलीये…! हीच गोष्ट तुला पण करता आली असती! Right?
माझ्या ह्या बोलण्याने अथर्व दचकला होता…
थोड्यावेळाने त्याने बोलायला सुरवात केली…
अथर्व : हं ठिक आहे, आपण दोघही एकमेकांना त्रास होणार नाहीअसे वागायचा प्रयत्न करूयात! मी अनन्याशी माझे contacts कमी करतो तु शोणपासून दूर हो…!
अथर्वने condition टाकली. . . . बर्याच चर्चे अंती आम्ही अथर्वच्या सांगण्याप्रमाणे करायच ठरवलं…
पण हे फार दिवस नाही टिकलं . . .
अनन्या आणि अथर्व project partners झाले तर शोणने lab partner म्हणून माझं नाव सांगून टाकलं. . . तरीही मी शोणशी प्रयत्नपुर्वक contact कमी केला.. .
मी आणि अथर्व आधीपण अनन्यावरून भांडलो होतो तेच भांडण आता शोणच्या रुपाने मोठं होत होतं. . . .
Few Days Later
मी आणि अथर्व नेहमी सारखे भेटलो आणि नेहमी सारखेच भांडलो सुद्धा. . . आमच भांडुन आम्ही शांत झाल्यावर अथर्व म्हणाला.. .
अथर्व : मी उद्याची २ tickets काढली आहेत.. .
मी: त्या अनन्यालाच घेउन जा.. . मला उद्या काम आहे.. .
खरंतर मला जायच होतं आणि माझं कामही show च्या आधी संपणार होतं. . . पण तरीही मी थोडस टाफरून म्हणाले.. .
“ठिक आहे . . .” अथर्वने विषयच संपवला.. .
Next Day
सकाळचे १० वाजले असतील, मी जेमतेम उठत होते की शिल्पाने विचारलं “अग आदीश ने २ tickets काढली आहेत पण मला जमणार नाही. . . तु जाशील?”
मला कालचा संवाद आठवला मला बघायचं होतं की खरच अथर्व अनन्या बरोबर movie ला जातो का ते? . . . मी पटकन हो म्हणाले… माझा अंदाज बरोबर ठरला अथर्व अनन्याला घेउन आला होता… आम्ही तिथेच भांडलो. . . .
दुसर्या दिवशी मी अथर्वला phone करून भेटायला बोलाव्लं. . .
मी कट्यावर पोहचले तर अथर्व already तिथे पोचला होता . . . .
अथर्व : तुला मझ्याबरोबर ययला वेळ नाही पण इतरांबरोबर जायला आहे.. .?
अथर्वने भांडणाचाच सुर लावला.. .
आम्ही दोघही एकमेकांना समजून घेणुआच्या पलीकडे गेलोय हे मला जाणवत होत.. .
अथर्व : आपण खरच एकत्र राहण्यात काही अर्थ आहे का?
त्याच्या ह्या प्रश्नाने मी पुरती हबकले.. . . and I was lost completely after that….पुढे अथर्व काय बोलतोय हे मी ऐकुच शकले नाही. . .
मी : “फक्त प्रेम हे नात्याचा आधार असु शकत नाही. . . त्या बरोबर एकमेकांना समजून घेणही तितकच आवश्यक आहे.. . . आणि आपण ते करु शकणार नसलो तर आपण वेगळं होणच आपल्या हिताच आहे.. . .” हे बोलायची हिंम्मत माझ्यात कुठून आली कोण जाणे…
२००४ मधे कधी तरी
मी झोपेतून जागी झाले ती तन्वीच्या फोनने.. .
मी : Hello… मी डोळे चोळतच phone उचलला . . .
तन्वी : वैदेही तुझ्यासठी जोरात स्थळ बघण सुरु आहे.. . next weekend ला तुला भेटायला एक मुलगा येणार आहे . . .
तन्वी खुप उत्साहात सांगत होती पण तीच्या बोलण्याने माझी झोप खाडकन उडाली. . .
तन्वीशी बोलन संपवून मी आईला phone केला.. . तिला अथर्व बद्दल सगळ सांगितलं. . .
पुढच्या सगळ्या गोष्टी खुप भराभर घडल्या.. . लग्नाची तारीख ठरली आणि तयारी जोरात सुरु झाली. . . .
तन्वी : वैदेही तु शोणला कळवलस?
मी : नाही. . . आणि त्याला मी सांगणार पण नाहीये.. . .
तन्वी : ठीक आहे मी सांगेन… तयारीला बोलावून घेउअ ८ दिवस आधी त्याला.. .
मी: शोण माझ्या लग्नाला येणार नाही तन्वी. . . . मला आणि अथर्वला दोघांनाही ते चालनार नाही. . . .
लग्नानंतरच १ वर्ष कसं गेलं हे कळल सुद्धा नाही. . .
२००५ मधे
आम्ही आमच्या पहील्या marriage anniversary ला कश्मिरला गेलो होतो. . . आमचं 2nd honey moon होतं मी खुप खुष होते… पण कश्मिरला पोचल्याच्या दुसर्याच दिवशी अनन्या भेटली. . . आमच भांडणही झालं मग मी अनन्याशीच स्पष्ट बोलले आणि त्या दोघांवर विश्वास ठेवायचा ठरवला. . .
पण लवकरच अथर्व – अनन्या माझ्याशी खोट बोलले आहेत याची मला जणिव व्हायला लगली. . . त्यांच वारंवार भेटण, अथर्वच माझ्याशी खोटं बोलणं. . ह्या सगळ्या गोष्टी मला खटकत होत्या आणि आमच्यातली पोकळी वाढत होती. . .
२००६ just few days before present day
माझी flight land झाली मी custums मधुन बाहेर आले पण अथर्व मला घ्यायला आला नव्हता, मी त्याचा phone खुप try केला.. पण switched off होता.. . मी taxi पकडली. . . .अथर्व कुठे असेल? अनन्या बरोबर असेल का? ह्याचाच विचार करत घराची bell वाजवली. . . .
अथर्वने दार उघडलं . . .
अथर्व : Oh shit…! मी completely विसरलो तुला घ्ययला यायच.. . . extremely sorry….
मी : हं. . . its okey… तुझा phone switched off आहे . . .
मी दारातल्या sandals कडे बघत विचारलं. . . .
मी : अनन्या आली आहे? काय चालू आहे?
हा बहुदा शेवटचा घाव होता.. .
Present Day
शोणला सगळ सांगितल्यावर मला जरा हलक वाटलं पण शोण काहीच बोलत नव्हता..
Chapter – 5
“शोण”
Present Day
वैदेही रडायची थांबत नव्हती आणि मला काही बोलायला सुचत नव्हतं…
मी : आपण एकदा अथर्वशी बोलायच का? (मी बराच वेळानंतर विचारलं)
वैदेही : त्याने काय होणार आहे? He has already filled for divorce ! आणि कशावरून तो परत अस वागणार नाही? त्यापेक्षा वेगळ होणच जास्त रास्त आहे.. .
पुन्हा थोड्यावेळ वैदेही भुतकाळात हरवली असावी…
वैदेही : तु मला कायम अशीच साथ देशील ना रे?
मी : काय उत्तर देउ मी तुला? . . . I’ll always be with you unless Tanvee doesn’t have any issues with it… but the day she objects to our relation माझा नाईलाज असेल …
वैदेही : तु लग्न करतोयस? तन्वीशी?
मी : हो. . . तेच सांगायला तिने परवा तुला phone केला होता पण तुझी अवस्था पाहून तिने सांगितल नसावं. . . .
वैदेही : हं . . . योग्य वेळेला आपल्या भावना share केल्या नाहीत याचा परिणाम भोगतीये मी . . . आज माझा life partner मला समजुन घेत नाही आणि जो मला समजू शकतो तो…
मी bill pay केलं आणि होटेल मधुन निघालो… वैदेही च्या flat वर आम्ही पोचलो, वैदेहीने purse मधुन किल्ली काढली, क्षणभर थांबून तिने माझ्या कडे बघितलं…
मी : वैदु Take care….! I am always just a phone call away….
वैदेहीने मला घट्ट मिठी मारली… काही क्षण माझ्या डोळ्यातही पाणी आलं… मग